भजनी मालिका

भजने

स्वप्नवत संसार माना हा निर्धार आशाश्वत्र जाणार छाया जैसी ॥१॥ मृगजळ नाथिलें दिसतसे जळ । पाहा हो प्रबळ पटळ मेघ जैसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्वप्नामाजीं अनिरुद्धें देखिलीसे उखा । तयालागीं घेउनी गेली चित्ररेखा ॥१॥ तया सोडविण्या हरी । धांव घेतसे झडकरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्वप्नामाजीं बंधन । जागृति पाहतां लटिकें स्वप्न ॥१॥ ऐशी जाणा देहस्थिती । जागृति स्वप्न तें भास चित्तीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्वप्नी ती हि कैसा न पडसी डोळा । सुंदर सावला घवघवीत ॥१॥ चतुर्भूज माळा रुळे येकावळी । कस्तुरी निढळीं रेखिलीसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्वप्नीं देखिलें तें जागृतीये नाहीं । हारपोनियां ठायी ठावोचि नुरे ॥१॥ तेचि परी झाली माझिया मानसा । संसारात माशा क्षंणेचि विरे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी । जालिया शेवटीं । जागे लटिकें सकळ ॥१॥ वायां भाकिली करुणा । मूळ पावावया शीणा । राव रंक राणा । कैंचे स्थानावरी आहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्वप्नींचिया परी देखिसी अभ्यास । न धरीच विश्वास चित्त तुझें ॥१॥ वांझेचिया स्तनीं अमृताची धणी । मृगजळ पाणी तान्हा बोले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

स्वप्नींचें हें धन हातीं ना पदरीं । प्रत्यक्ष कां हरी होऊं नये ॥१॥ आजुनि कां करा चाळवाचाळवी । सावकाशें द्यावी सत्य भेटी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्वप्नें दिसे स्वयेंचि नासे । तैसें काल्पनिक जग भासे ॥१॥ मुळींच मिथ्या मृगजळ । त्यामाजीं नसे शीतळ जळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ