भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नींचिया परी देखिसी अभ्यास । न धरीच विश्वास चित्त तुझें

svapninchiya pari dekhisi abhyas | na dharich vishvas chitta tujhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
स्वप्नींचिया परी देखिसी अभ्यास । न धरीच विश्वास चित्त तुझें ॥१॥ वांझेचिया स्तनीं अमृताची धणी । मृगजळ पाणी तान्हा बोले ॥२॥ तरी प्रेमावीण फळती क्रियाकर्म । हातां येतीं वर्में विठोबाचीं ॥३॥ दृष्टीतें देखणें श्रवणीं ऐकणें । मनाचें बैसणें एक होय ॥४॥ नामा ह्मणे तरीच विठो येऊन भेटे । कावळ पालटे कैवल्य होय ॥५॥