भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वभावें विचरतां महीं

svabhaven vicharatan mahin

स्वभावें विचरतां महीं । सम ब्रह्म दिशा दाही । एकु एकला आस पाही । सर्वाघटीं बाईये वो ॥१॥ दुजें द्वैत हेतु सांडी । एकतत्त्वसार मांडी । हरिविण इये पिंडी नाहीं वो माये ॥२॥ काय सांगो याच्या गोष्टी । अवघा दिसे हाचि सृष्टि । विश्वरुप किरीटी । अर्जुना दिठीं दावियलें ॥३॥ ज्ञानदेव दीप उघड । उजळुनी केलासे वाड । माय देवीं आम्हां नाही चाड । अवघा गोड हरि आमुचा ॥४॥