भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नीं चालतां लवलाही । आडामध्यें पडिला पाही

svapnin chalatan lavalahi | adamadhyen padila pahi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्वप्नीं चालतां लवलाही । आडामध्यें पडिला पाही ॥१॥ घाबरूनी म्हणे धांवा । तैसे भुलले जीवजीवा ॥२॥ मृगजळ भासे नीर । वायां मागें पसर ॥३॥ सावध होऊनि जंव पाहे । वायां स्वप्न मिथ्या आहे ॥४॥ एका जनार्दनीं भुलले । वायां गेले अधोगती ॥५॥