भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नींचें हें धन हातीं ना पदरीं । प्रत्यक्ष कां हरी होऊं नये

svapninchen hen dhan hatin na padarin | pratyaksha kan hari houn naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्वप्नींचें हें धन हातीं ना पदरीं । प्रत्यक्ष कां हरी होऊं नये ॥१॥ आजुनि कां करा चाळवाचाळवी । सावकाशें द्यावी सत्य भेटी ॥ध्रु.॥ बोलोनियां फेडा जीवींची काजळी । पाहेन कोमळीं चरणांबुजें ॥२॥ तुका म्हणे माझ्या जीवींचिया जीवा । सारूनियां ठेवा पडदा आतां ॥३॥