भजनी मालिका

भजने

सोडीं कान्हा रवि दोर मथित्या देतें । बया मज तें दे आई मज तें दे डेरां घुमघुमतें ॥१॥ यशोदा उचलोनी कडे त्यासी घेउनी । दाविती चित्रशाळेतें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोडुनी तया न वचे दुरी । त्यांचा करी प्रतिपक्ष ॥१॥ म्हणे मी त्यांचा तेही माझे । नव्हती दुजे कल्पांतीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सोडोनियां गळा मुक्त केले त्यांसी । पिऊनि उदकासी आली पुढती ॥१॥ क्षुधेलासी फार न लावीं उशीर । घेऊनिय़ां शस्त्र हाणी वेगें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोनियाचा दीन आजी हा घडला । सणी साधू आला संत घरा श्रोता कीर्तनासी दीवाळीचे सणी । आला वोवाळणी साधावया

रचनाकार: संत तुकाविप्र

सोनियांचा देव सोनियाचें देऊळ । सोनियांचा भक्त पूजी सोनियाच्या कमलें ॥१॥ नामची पैं रूप तें अभिन्न । जगीं जनार्दन तोचि पाहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोनियाचीं झाडें अनेक कर्दळी । त्यांत रानकेळी फोंफावल्या ॥१॥ सिताफळी भरित अवघी तापीथडी । दाट दिसती गाढी रामफळें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं ॥१॥ मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साठी विकुं पाहे ॥१॥ पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ॥१॥ परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथें हे उपाय न सरती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सोपा मंत्र द्वदश अक्षरीं । वाचे जपे तुं निर्धारीं । अंतकाळीं हरी । न विंसबे तुजसी ॥१॥ धन्य धन्य मंत्रराज । तेणें साधिलें बहुकाज । आम्हं सांपडले निज । वैकुंठभुवनाचें निर्धारें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोपा मंत्र वाचे हरीहरी म्हणा । तुटेल बंधना यमाचिया ॥१॥ न करी आळस हाचि उपदेश । येणें सावकाश तरती जगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोपा वृक्ष फळासी आला । विठ्ठलनामें विस्तारला ॥१॥ वेदां न कळे मूळ शेंडा । शास्त्रें भांडतां पैं तोंडा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सोपा ह सुगम उपावो परीस । धरीं तू विश्वास नाममहिमें ॥१॥ नाम हेंचि गंगा नाम हेंचि भीमा । अंतरीं श्रीरामा जपिजेसू ॥२॥

रचनाकार: संत नामदेव