भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साठी विकुं पाहे

sonen davi vari tamben tayapotin | khariyache sathi vikun pahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साठी विकुं पाहे ॥१॥ पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥ क्षीरा नीरा कैसें होय एकपण । स्वादीं तोचि भिन्न भिन्न काढी ॥२॥ तुका म्हणे थीता आपणची चि खोटा । अपमान मोटा पावईल ॥३॥