भजनी मालिका

भजने

सारसार दोन्ही । न दिसती नयनीं । अवचिता गगनीं । बिंबलासे ॥१॥ लोपले रविशशि । तेज न माये आकाशीं । मेघ:श्याम मेघाशीं । लपविलें ॥ध्रु०॥

सारांचे सार गुह्मांचें निजगुह्मा । तें हें उभें आहे पंढरेये ॥१॥ चहुं वांचापरतें वेदां जें आरुतें । ते उभे आहे सरतें पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

साराचेंहि सार भक्तीचें भांडार । नाम निरंतर गातां वाचे ॥१॥ कासया करावें आणिक साधन । नामविण क्षण जाऊं नेदी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सारावीं लिगाडें धरावा सुपंथ । जावें उसंतीत हळूहळू ॥१॥ पुढें जातियाचे उमटले माग । भांबावलें जग आडरानें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठीं विठोबाचें ॥१॥ तयाच्या चिंतनें निरसलें संकट । तराल दुर्घट भवसिंधु ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सारासार विचार करिती अवघे जन । हे ज्ञान अंजन दाविलें डोळां ॥१॥ पाहिलें गे माय अंतरींचें सुख । वैकुंठनायक उभा असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सारीन तें आतां एकाचि भोजनें । वारीन मागणें वेळोवेळां ॥१॥ शेवटींचा घास गोड करीं माते । अगे कृपावंते पांडुरंगे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सारुनी अवघींच मतांतरें । जे लटिक्यासी खरें मानिती ॥१॥ एकचि दृढाविती भावो । जेणें देवो जोडे तो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सारुनी दृश्य देखतां जालीसे ऐक्याता । पाहे कृष्णनाथा पंढरीये ॥१॥ कर ठेउनी कंटीं बुंथी वाळुवंटीं । वैजयंती कंठीं आती माझी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सारुनी भोजनें कीर्तनीं बैसले । थोरीव वर्णिले विठोबाचे ॥१॥ प्रात:काळीं स्त्रियांसहित तो गोरा । निघालासे त्वरा पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सावडीं कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥१॥ मुसळ आधारीं आवरूनि धरीं । सांवरोनि थोरीं घाव घालीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सावध ऐकें साजणी । प्रवेशतां रामानुसंधांनीं । चित्त चित्तपणा विसरुणी । राम होउनी स्वयें राहे ॥१॥ द्रष्टा परिछिन्न होय । तैं दृश्य दृश्यत्वें दिसों लाहे । श्रीराम स्वयें तैसा नोहे । परी तें माय सांगेन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ