भजनी मालिका
← भजनांकडे परत

सालोमालो हरीचे दास । म्हणउन केला अवघा नास

salomalo hariche das | mhanaun kela avagha nas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सालोमालो हरीचे दास । म्हणउन केला अवघा नास ॥१॥ अवघें बचमंगळ केलें । म्हणती एकांचें आपुले ॥ध्रु.॥ मोडूनि संतांचीं वचनें । करिती आपणां भूषणें ॥२॥ तुका म्हणे कवी । जगामधीं रूढी दावी ॥३॥