भजनी मालिका
← भजनांकडे परत

साराचेंहि सार भक्तीचें भांडार । नाम निरंतर गातां वाचे

sarachenhi sar bhaktichen bhandar | nam nirantar gatan vache

रचनाकार: संत नामदेव · अभंग
साराचेंहि सार भक्तीचें भांडार । नाम निरंतर गातां वाचे ॥१॥ कासया करावें आणिक साधन । नामविण क्षण जाऊं नेदी ॥२॥ दया शांति हेंचि पै भूषण । नामसंकीर्तन अहर्निशीं ॥३॥ नामा म्हणे जप अखंड नामाचा । काळ हा सुखाचा सदोदित ॥४॥