भजनी मालिका
← भजनांकडे परत

सारीन तें आतां एकाचि भोजनें । वारीन मागणें वेळोवेळां

sarin ten atan ekachi bhojanen | varin maganen velovelan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सारीन तें आतां एकाचि भोजनें । वारीन मागणें वेळोवेळां ॥१॥ शेवटींचा घास गोड करीं माते । अगे कृपावंते पांडुरंगे ॥ध्रु.॥ वंचूं नये आतां कांहीं च प्रकार । धाकल्याचें थोर झाल्यावरी ॥२॥ तुका म्हणे पोटी बहु झाला वाव । कांहीं नेदीं ठावें उरों मागें ॥३॥