भजनी मालिका
← भजनांकडे परत

सारांचे सार गुह्मांचें निजगुह्मा । तें हें उभें आहे पंढरेये

saranche sar guhmanchen nijaguhma | ten hen ubhen ahe pandhareye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सारांचे सार गुह्मांचें निजगुह्मा । तें हें उभें आहे पंढरेये ॥१॥ चहुं वांचापरतें वेदां जें आरुतें । ते उभे आहे सरतें पंढरीये ॥२॥ शास्त्रांचें निज सार निगमां न कळे पार । तोचि हा परात्पर पंढरीये ॥३॥ एका जनार्दनी भरुनि उरला । तोचि हा देखिला पंढरीये ॥४॥