भजनी मालिका
← भजनांकडे परत

सारासार धीर निर्गुण परतें

sarasar dhir nirgun paraten

सारासार धीर निर्गुण परतें । सादृश्य पुरतें हरिनाम ॥ १ ॥ तें हें कृष्णनाम यशोदेच्या घरीं । वनीं गायी चारी यमुने तटीं ॥ २ ॥ सुलभ आगमनिगम । तो हा आत्माराम गोपवेषें ॥ ३ ॥ निवृत्तीचे पार गयनीचें गुज । मज मंत्रबीज उपदेशिलें ॥ ४ ॥