भजनी मालिका
← भजनांकडे परत

सारासार विचार करिती अवघे जन । हे ज्ञान अंजन दाविलें डोळां

sarasar vichar kariti avaghe jan | he dnyan anjan davilen dolan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सारासार विचार करिती अवघे जन । हे ज्ञान अंजन दाविलें डोळां ॥१॥ पाहिलें गे माय अंतरींचें सुख । वैकुंठनायक उभा असे ॥२॥ ज्ञानदेवायोगें सकळांशी दर्शन । परब्रह्म निधान डुल्लतसे ॥३॥ अवघे जन कोडें घालिती सांकडें । सांगावे निवाडे नामयाचे ॥५॥ देव म्हणे नामा विचारिलें आम्हां । ते कां संधी तुम्हां कळली नसे ॥६॥