भजनी मालिका

भजने

आपुलिया सुखा आपणचि आला । उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥ तें हें सगुण रूप चतुर्भुज मूर्ति । शंख चक्र हातीं गदा पद्म ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

आपुलिया हिता आपण जागिजे । वायां न नागविजे देही देहा ॥१॥ हाचि अनुताप घेऊनियां मना । करी पां चिंतना रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरीख वाटे देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपुली करणी न विचारी मनीं । वांयां काय ठेवूनि बोल जिवा ॥१॥ खाटकी जो चेपी पशूची नरडी । अवचिता करं-गळी सांपडली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आपुली कसोटी शुद्ध राखी कारण । आगीनें भूषण अधिक पुटा ॥१॥ नाहीं कोणासवें बोलणें लागत । निश्चिंतीनें चित्तसमाधान ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपुली पदवी सेवकासी द्यावी । तो एक गोसावी पांडुरंग ॥१॥ भावाचा आळुका भुलला भक्तिसुखा । सांपडला फुका नामासाठीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आपुली पूजा आपण करावी । ही जंव ठावी राहटीं नाहीं ॥१॥ कासया ती पूजा जाणिवेचा शीण । त्याहुनी अज्ञान बरा दिसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आपुलीच दारा जरी टेके व्यभिचार । क्रोधाचा थारा अंतरीं नये ॥१॥ आपुलेंच धन तस्करें नेतां जाण । जयांचें मन उद्विग्र नव्हे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आपुलें आपण जाणावें स्वहित । जेणें राहे चित्त समाधान ॥१॥ बहुरंगें माया असे विखुरली । कुंठिंत चि जाली होतां बरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपुलें कल्याण इच्छिलें जयासी । तेणें या नामासी विसंबूं नये ॥१॥ करील परिपुर्ण मनींचे हेत । ठेविलिया चित्त नामापाशी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आपुले गांवींचें न देखेसें जालें । परदेसी एकलें किती कंठूं ॥१॥ म्हणऊनि पाहें मूळ येतां वाटे । जीवलग भेटे कोणी तरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आपुलें तुम्हीं न संडावें । कर्म स्वाभावें आहे तें ॥१॥ सांभाळावें नामधरका । निरसुनी पातका भेटी दयावी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आपुले पारखे सांगतां नायकती । करितसे खंती संसाराची ॥१॥ काय संसाराचें सुख तें तयासी । कोण फांसा चुकवील ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ