भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया

apuliya hita jo ase jagata | dhanya mata pita tayachiya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरीख वाटे देवा ॥ध्रु.॥ गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥२॥ तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥