भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुली कसोटी शुद्ध राखी कारण । आगीनें भूषण अधिक पुटा

apuli kasoti shuddha rakhi karan | aginen bhushan adhik puta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुली कसोटी शुद्ध राखी कारण । आगीनें भूषण अधिक पुटा ॥१॥ नाहीं कोणासवें बोलणें लागत । निश्चिंतीनें चित्तसमाधान ॥ध्रु.॥ लपविलें तें ही ढेंकरें उमटे । खोटियाचें खोटें उर फोडी ॥२॥ तुका म्हणे निंदा स्तुति दोन्ही वाव । आपुलाला भाव फळा येतो ॥३॥