भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलें कल्याण इच्छिलें जयासी । तेणें या नामासी विसंबूं नये

apulen kalyan ichchhilen jayasi | tenen ya namasi visambun naye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आपुलें कल्याण इच्छिलें जयासी । तेणें या नामासी विसंबूं नये ॥१॥ करील परिपुर्ण मनींचे हेत । ठेविलिया चित्त नामापाशी ॥२॥ भुक्ति आणि मुक्ति वोळगंती सिद्धि । होईल कीं वृद्धि आत्मनिष्ठा ॥३॥ एका जनार्दनीं जपतां हें नाम । पुरवील काम जो जो हेतु ॥४॥