भजनी मालिका

भजने

असोनि कुळींचा हीन । परी ज्यासी ब्रह्माज्ञानी । त्यासी तिन्हीं देवादि सुरगण । वंदिताती ॥१॥ त्याची मृत्युलोकीं सेवा । जयासी घडे सदैवा । मा ब्राह्मण भूदेवा । असंख्य पुण्य जोडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

असोनि न कीजे अलिप्त अहंकारें । उगी च या भारें कुंथाकुंथी ॥१॥ धांवा सोडवणें वेगीं लवकरी । मी तों जालों हरी शक्तीहीन ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

असोनि न दिसे लौकिक वेव्हरीं । ऐसा तूं अंतरीं लपवीं मज ॥१॥ परि तुझे पायीं माझें अनुसंधान । वरी प्रेमाजीवन देई देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

असोनि न दिसे वेगळाचि असे । तो पंढरीसी वसे विटेवरी ॥१॥ कैवल्य उघडें राहिलेंसे उभे । कर्दळींचें गाभे समपदीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

असोनि नसणें या नांव स्वार्थ । येथेंचि परमार्थ सुखी होय ॥१॥ स्वार्थ परमार्थ आपुलेची देहीं । अनुभवोनि पाहीं तुझा तूंची ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

असोनि नसणें संसाराचे ठाईं । हाचि बोध पाहीं मना घ्यावा ॥१॥ संतांची संगती नामाची आवडी । रिकामी अर्ध घडी जावों नेदी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

असोनी उत्तम न करी भजन । संतसेवा दान धर्म नेणें ॥१॥ काय त्यांचे कुळ चांडाळ चांडाळ । मानी तो विटाळ यमधर्म ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

असोनी देहीं आम्हीं विदेही भाई । नातळों कर्म अकर्माचें ठायीं ॥१॥ माझें नवल म्यांच पाहिलें डोळां । शब्द निःशब्द राहिलों वेगळा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

असोनी सबराभरी बाह्मा आणि अंतरीं । संपुष्टामाझारीं म्हणती देव ॥१॥ कल्पनेचा देव ऐसा जया भाव । तो न करी निर्वाहो आम्हा लागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अस्त नाहीं आतां एक चि मोहोरा । पासूनि अंधारा दुरि जालों ॥१॥ साक्षत्वें या जालों गुणाचा देखणा । करीं नारायणा तरी खरें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अस्तमान जालिया ग्रामांत परतले । गोपाळ ते गेले घरोघरीं ॥१॥ आपुलिया गृहीं रामकृष्ण आले । यशोदेनें केलें निंबलोण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अहं तृणावर्त बळी । प्रवेशला गोकुळीं । मोहममतेची राहाटोळी । भवंडीतसु ॥१॥ रज उधळले तेणें बळें । झाकोळले बुद्धीचे डोळे । कृष्ण आहे नाहीं हें न कळे । सकळिकांसी हो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अहं सोहं कोहं सर्व आटलें । दृश्य द्रष्ट्रत्व सर्व फिटलें ॥१॥ ऐसी कृपेची साउली । माझी जनार्दन माउली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ