भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोनि अलिप्त सर्वसंगी । आत्मा भोगी ना विरागी

asoni alipta sarvasangi | atma bhogi na viragi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
असोनि अलिप्त सर्वसंगी । आत्मा भोगी ना विरागी ॥१॥ ऐसें जाणती ते ज्ञानी । नित्यमुक्त त्रिभुवनीं ॥२॥ मी हें स्फुरे जेथूनियां । आत्मा परचि त्याहूनियां ॥३॥ निळा म्हणे मी हे वदती । मूर्ख देहातेंचि कल्पिती ॥४॥