भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोनी सबराभरी बाह्मा आणि अंतरीं । संपुष्टामाझारीं म्हणती देव

asoni sabarabhari bahma ani antarin | sampushtamajharin mhanati dev

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
असोनी सबराभरी बाह्मा आणि अंतरीं । संपुष्टामाझारीं म्हणती देव ॥१॥ कल्पनेचा देव ऐसा जया भाव । तो न करी निर्वाहो आम्हा लागीं ॥२॥ सुक्षेत्रीं पुण्य अनुक्षेत्रीं पाप । न चले हा संताप कल्पनेचा ॥३॥ काशी हो पंढरी तीर्थयात्रा करी । सर्वत्र नरहरी तोचि भाव ॥४॥ एका जनार्दनीं सर्व सिद्धि असे । नाथिलेंचि पिसें मतवाद्या ॥५॥