भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहं सोहं कोहं सर्व आटलें । दृश्य द्रष्ट्रत्व सर्व फिटलें

ahan sohan kohan sarva atalen | drushya drashtratva sarva phitalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहं सोहं कोहं सर्व आटलें । दृश्य द्रष्ट्रत्व सर्व फिटलें ॥१॥ ऐसी कृपेची साउली । माझी जनार्दन माउली ॥२॥ द्वैत अद्वैताचें जाळें । उगविलें कृपाबळें ॥३॥ अवघें एकरुप जाहलें । दुजेपणाचे ठाव पुसिले ॥४॥ शरण एका जनार्दनीं । एकपणें भरला अवनीं ॥५॥