भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोनि नसणें संसाराचे ठाईं । हाचि बोध पाहीं मना घ्यावा

asoni nasanen sansarache thain | hachi bodh pahin mana ghyava

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
असोनि नसणें संसाराचे ठाईं । हाचि बोध पाहीं मना घ्यावा ॥१॥ संतांची संगती नामाची आवडी । रिकामी अर्ध घडी जावों नेदी ॥२॥ काम क्रोध सुनेपरी करी दूरी । सहपरिवारी दवडी बापा ॥३॥ चोखा म्हणे सुख आपेआप घरा । नाहीं तर फजीतखोरा जासी वायां ॥४॥