भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोनि दुराचारी । मुखा गाय नित्य हरी

asoni durachari | mukha gay nitya hari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
असोनि दुराचारी । मुखा गाय नित्य हरी ॥१॥ तयाचें नमस्कारावे चरण । धन्य जगीं तो पावन ॥२॥ वाचे सदा गाय नाम । तोचि पावे निजधाम ॥३॥ एका शरण जनार्दनीं । तोचि पवित्र त्रिभुवनीं ॥४॥