भजनी मालिका
← भजनांकडे परत

अस्त नाहीं आतां एक चि मोहोरा । पासूनि अंधारा दुरि जालों

asta nahin atan ek chi mohora | pasuni andhara duri jalon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अस्त नाहीं आतां एक चि मोहोरा । पासूनि अंधारा दुरि जालों ॥१॥ साक्षत्वें या जालों गुणाचा देखणा । करीं नारायणा तरी खरें ॥ध्रु.॥ आठवें विसरु पडियेला मागें । आलें तें चि भागें यत्न केलें ॥२॥ तुका म्हणे माझा विनोद देवासी । आम्ही तुम्हां ऐसीं दोन्ही नव्हों ॥३॥