भजनी मालिका
← भजनांकडे परत

अस्तमान जालिया ग्रामांत परतले । गोपाळ ते गेले घरोघरीं

astaman jaliya gramant paratale | gopal te gele gharogharin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अस्तमान जालिया ग्रामांत परतले । गोपाळ ते गेले घरोघरीं ॥१॥ आपुलिया गृहीं रामकृष्ण आले । यशोदेनें केलें निंबलोण ॥२॥ षड्रस पक्वान्नीं विस्तारिलें ताट । जेविती वैकुंठ नंदासवें ॥३॥ नंदासवें जेवीं वैकुंठीचा हरी । ब्रह्मादिक सरी न पावती ज्यांची ॥४॥ एका जनार्दनीं ऐसी लीला खेळे । परब्रह्मा सांवळें कृष्णरुप ॥५॥