भजनी मालिका

भजने

जेथें नाहीं कांहीं नाम रूप गुण । बोलती निर्गुण तया-लागीं ॥१॥ तोचि गोकुळांत होऊनि गोंवळ । झणवितो बाळ यशो-देचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जेथें निरसोनियां द्वैत म्हणताती अद्वैत । त्याहुनी अतीत स्वरुप माझें ॥१॥ तें मी लक्ष्याही लक्ष्य पराचेंही पर । जेथें वेदशास्त्रें लाजोनी गेलीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जेथें परापश्यन्तीची मावळली भाष । तो स्वयंप्रकाश दावी गुरु ॥१॥ तेणें माझें मना जाहलें समाधान । निरसला शीण जन्मोजन्मी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जेथें पाहें तेथें कांडिती भूस । चिपाडें चोखूनि पाहाती रस ॥१॥ काय सांगों देवा भुलले जीव । बहु यांची येतसे कींव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेथें माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथें चि हें मन गुंडाळतें ॥१॥ टाळावी ते पीडा आपणापासून । दिठाविलें अन्न ओकवितें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जेथें मुख्यत्वें करावी भक्ति । घडावी संतांची संगती । हेंचि मागणें तुम्हाप्रतीं । द्यावें निश्चिती मज देवा ॥१॥ पुरवा पुरवा माझा हेत । दुजें मागणें नाहीं निश्चित ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

जेथें सत्त्वाचें प्राधान्य । जेथें सात्विकाचें आचरण । तो परलोक साधुन । साधूनी गेला ॥१॥ जेथें राजाचें प्राधान्य । त्याचें लोभी वसे मन । ज्ञान सांगे मुख्य करून । परि निष्ठा नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जेथोनि त्रिपुटीचें विंदान । दृश्य द्रष्टा आणि दरुशन ॥१॥ अध्यात्म अधिभुत असतां पाहीं । अधिदैव सुर्य जेथें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ