भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथोनि त्रिपुटीचें विंदान । दृश्य द्रष्टा आणि दरुशन

jethoni triputichen vindan | drushya drashta ani darushan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जेथोनि त्रिपुटीचें विंदान । दृश्य द्रष्टा आणि दरुशन ॥१॥ अध्यात्म अधिभुत असतां पाहीं । अधिदैव सुर्य जेथें नाहीं ॥२॥ अध्यात्म अधिदैव दोन्हीं आहे । अधिभुत दृश्य दरुशन पाहे ॥३॥ जेथें दृश्याचें दरुशन । तेथें एक जनार्दन ॥४॥