भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें नाहीं कांहीं नाम रूप गुण । बोलती निर्गुण तया-लागीं

jethen nahin kanhin nam rup gun | bolati nirgun taya-lagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जेथें नाहीं कांहीं नाम रूप गुण । बोलती निर्गुण तया-लागीं ॥१॥ तोचि गोकुळांत होऊनि गोंवळ । झणवितो बाळ यशो-देचा ॥२॥ चिन्मय चिद्रूप अक्षय अपार । अपार परेहूनि पर ह्मणती ज्यातें ॥३॥ सर्वां भूतांचे फुटकाये खोळें । भरलें न गळे आत्मपणें ॥४॥ आनंदी आनंद मातला अपार । वेदालाही पार नाही ज्याचा ॥५॥ नामा ह्मणे सर्व रूपें जें रूपस । गोकुळीं विलास मांडियेला ॥६॥