भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें वाजविला वेणु शुद्ध । म्हणोनि म्हणती वेणुनाद

jethen vajavila venu shuddha | mhanoni mhanati venunad

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जेथें वाजविला वेणु शुद्ध । म्हणोनि म्हणती वेणुनाद ॥१॥ सकळीक देव आले । ते भोंवती राहिले ॥२॥ जोडिलें जेथे समपद । तया म्हणती विष्णूपद ॥३॥ भोवंतालीं पदें उमटली । तेथे गोपाळ नाचती ॥४॥ जेथें उभे गाईचें भार । ते अद्यापि दिसत खुर ॥५॥ गोपाळांची पदें समग्र । ठाई शोभते सर्वत्र ॥६॥ एका जर्नादनीं हरी शोभले । कार कटावरी ठेऊनि भले ॥७॥