भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें रूप रेखा ना आपण आसका

jethen rup rekha na apan asaka

जेथें रूप रेखा ना आपण आसका । सर्व रूपें देखा हरि माझा ॥ १ ॥ तें रूप गोजिरें नंदाघरीं असे । जनीवनीं दिसे गोपिकांसि ॥ २ ॥ नादभेद कळा जेथें भेद नुठी । ब्रह्मरूपें तुष्टि अवघी होय ॥ ३ ॥ निवृत्ति जन जन वन देख । आत्मरूपभाव ब्रह्म जाला ॥ ४ ॥