भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश

jethen vaishnavancha vas | dhanya bhumi punya desh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥१॥ दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु.॥ गरुडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जयजयकारें ॥२॥ सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥३॥ तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥४॥ तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें राणें ॥५॥