भजनी मालिका

भजने

जया कारणें योगयोग तपें करती । ती हे उभी बाळ विठ्ठल मूर्तीं । अंगीं तेजाची न माय दीप्ती । कंठीं वैजयंती शोभती गे माया ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

जया कारणें वेद अनुवादती । शास्त्रे पुरणें भांडती ॥१॥ तो हा देवाधिदेव बरवा । विठ्ठल ठावा जगासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जया जे वासना तया ती भावना । होतसे जाणा आदि अंतीं ॥१॥ कामाचे विलग आवरावें चित्त । क्रोधाचा तो ऊत शांतवोनी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

जया जे वासना ते पुरवीत । आपण तिष्‍ठत राहे द्वारीं ॥१॥ बळीचिया भावा द्वारपाळ होय । सुदाम्याचें खाय पोहें सुखें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

जया दोषां परीहार । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र । ते हरती अपार । पंढरपुर देखिलिया ॥१॥ धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मातीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनादीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जयां नामाचा विश्वास । धन्य तेंचि हरिचे दास । वंदीन पायंस । वारंवार तयांच्या ॥१॥ कुळ तारिलें सकळ । वाचे नामावळी अढळ । गाती रामनाम सरळ । नोहे क्षण आराणूक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत सर्व लोकीं ॥१॥ त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दात खाय कराकरा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जया संतचरणी नाहीं विश्वास । धिक त्यास वास यमपुरी ॥१॥ संतचरणीं मन ठेवा रे निश्चळ । करुना उतावेळ भाका त्यासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ