भजनी मालिका
← भजनांकडे परत

जया जे वासना ते पुरवीत । आपण तिष्‍ठत राहे द्वारीं

jaya je vasana te puravit | apan tish‍that rahe dvarin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
जया जे वासना ते पुरवीत । आपण तिष्‍ठत राहे द्वारीं ॥१॥ बळीचिया भावा द्वारपाळ होय । सुदाम्याचें खाय पोहें सुखें ॥२॥ विदुराचें घरीं आवडीं कण्या खाय । हात पसरिताहे भाजी पाना ॥३॥ गौळियाचे घरीं करीतसे चोरी । काला स्वयें करी गोपाळांसी ॥४॥ चोखा म्हणे ऐसा नाटकी श्रीहरी । तोचि हा पंढरी भीमातटीं ॥५॥