भजनी मालिका
← भजनांकडे परत

जया कारणें वेद अनुवादती । शास्त्रे पुरणें भांडती

jaya karanen ved anuvadati | shastre puranen bhandati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जया कारणें वेद अनुवादती । शास्त्रे पुरणें भांडती ॥१॥ तो हा देवाधिदेव बरवा । विठ्ठल ठावा जगासी ॥२॥ नये श्रुतीसी अनुमाना । तो देखणा पुडंलीका ॥३॥ आगम निगमां न कळे पार । एका जनार्दनीं निर्धार ॥४॥