भजनी मालिका
← भजनांकडे परत

जया म्हणती नीचवर्ण । स्त्री शुद्रादि हीनजन

jaya mhanati nichavarna | stri shudradi hinajan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जया म्हणती नीचवर्ण । स्त्री शुद्रादि हीनजन ॥१॥ सर्वाभूतीं देव वसे । नीचा ठाई काय नसे ॥२॥ नीच कोठोनि जन्मला । पंचभूतां वेगळा जाला ॥३॥ तया नाहीं का जनन । सवेंचि होत पतन ॥४॥ नीच म्हणोनि काय भुली । एका जनार्दनीं देखिली ॥५॥