भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयां सुखाची आशा आहे । त्यांनी जावें पंढरीसी

jayan sukhachi asha ahe | tyanni javen pandharisi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयां सुखाची आशा आहे । त्यांनी जावें पंढरीसी ॥१॥ अमुपासी अमुप देतां । परी भरले ते सर्वथा ॥२॥ सुखाचिया भरल्या राशी । पाहिजे त्यासी त्यांनें घ्यावें ॥३॥ न सरेचि ब्राह्मादिकीं । भरलेंदेखा भरतें ॥४॥ एका जनार्दनीं सुख । अलौकिक देख पंढरीये ॥५॥