भजनी मालिका
← भजनांकडे परत

जया जैसा हेत । तैसा संत पुरविती

jaya jaisa het | taisa sant puraviti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जया जैसा हेत । तैसा संत पुरविती ॥१॥ उदारपणें सम देणें । नाहीं उणें कोणासी ॥२॥ भलतिया भावें संतसेवा । करिता देवा माने तें ॥३॥ एका जनार्दनीं त्यांचा दास । पूर्ण वोरस कृपेचा ॥४॥