भजनी मालिका

भजने

जन हें सुखाचें दिल्याघेतल्याचें । अंत हें काळींचें नाहीं कोणी ॥१॥ जाल्या हीन शक्ती नाकडोळे गळती । सांडोनि पळती रांडापोरें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जनक तूं माझा जननी जगाची । करूणा आमुची कां हो नये ॥१॥ कासया संसार लावियेला पाठीं । पडलीसे तुटी तुमची माझी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

जनचिया बोले करी नित्य काम । वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥ जनीचिया गोष्टी प्रेम ज्याचे मनीं । तयाचें चरणीं ओढवी माथा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जननिया बाळका रे घातलें पाळणा । पंचतत्त्वी जोडियेल्या वारतिया चहूं कोणा । अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनि हातीं भाव दावी खेळणा ॥१॥ निजीं रे निजीं आतां । म्हणोनि परिये दे माता । खेळतां कष्टलासी बाळा तूं रे नेणतां । निजीं रे निजीं आतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जननिये जिवलगे येवो पांडुरंगे । शिणलों भेटि दे गे एक वेळां ॥१॥ त्राहे त्राहे त्राहे कृपादृष्टीं पाहे । येऊनियां राहे ह्रदयामाजीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जननी हे जाणे बाळकाचें वर्म । सुख दुःख धर्म जें जें कांहीं ॥१॥ अंधापुढें जेणें दिधला आधार । त्याचा हा विचार तोचि जाणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जननी हे म्हणे आहा काय झालें । शरीर रक्षिलें काय काजें ॥१॥ काय काज आतां हरीविण जिणें । नित्य दुःख कोणें सोसावें हें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जनार्दन पाया धरूनियां राहें । संसार तो काय करील तुझें ॥१॥ स्वरूपाचें ज्ञान नोहे अनायासें । ज्याचें श्रुति पिसें लागलेंसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जनार्दनं मज केला उपकार । पाडिला विसर प्रपंचाचा ॥१॥ प्रपंच पारखा जाहला दुराचारी । केलीसे बोहरी कामक्रोधां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जनार्दनीं माय जनार्दन बाप । जनार्दन ताप निवारिती ॥१॥ जनार्दन बंधु जनार्दन भगिनी । जनार्दन निर्वाणी मजलागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जनार्दनीं शोभित जन । जनार्दनें साचार ज्ञान । जनार्दनें आकळें मन । ध्याता ध्येय ध्यान जनार्दन ॥१॥ गाई जनार्दन मुखकमळीं । जनार्दनु नयनीं न्याहाळी । ह्रुदयकमळीं । जनार्दनु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जनार्दनें आम्हां सांगितलें गुज । पूजावे हे द्विज आवडीनें ॥१॥ मुखीं ज्याच्या तोचि नारायण । भिन्नभाव जाण भावूं नको ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ