भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनार्दनं मज केला उपकार । पाडिला विसर प्रपंचाचा

janardanan maj kela upakar | padila visar prapanchacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जनार्दनं मज केला उपकार । पाडिला विसर प्रपंचाचा ॥१॥ प्रपंच पारखा जाहला दुराचारी । केलीसे बोहरी कामक्रोधां ॥२॥ आशा तृष्णा यांचे तोडियलें जाळें । कामनेचें काळें केलें तोंड ॥३॥ एका जनार्दनीं तोडियेलें लिगाड । परमार्थ गोड दाखविला ॥४॥