भजनी मालिका
← भजनांकडे परत

जना जन पाळिताहे वृध्दा बाळपण बाळा वृध्दपण

jana jan palitahe vrudhda balapan bala vrudhdapan

रचनाकार: संत रामदास · अभंग
जना जन पाळिताहे वृध्दा बाळपण बाळा वृध्दपण । अंतर शोधुनि पाहें श्रेष्ठ कनिष्ठा कनिष्ठ श्रेष्ठां । उसिणें फिटत जाय जग जगाचें जीवन साचें । कर्ता तो करिताहे एका पाळितो पाळुनि घेतो । दोंहिकडे फिरताहे अंतरवासी देव विलासी । दास समजत राहे