भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनार्दन पाया धरूनियां राहें । संसार तो काय करील तुझें

janardan paya dharuniyan rahen | sansar to kay karil tujhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जनार्दन पाया धरूनियां राहें । संसार तो काय करील तुझें ॥१॥ स्वरूपाचें ज्ञान नोहे अनायासें । ज्याचें श्रुति पिसें लागलेंसे ॥२॥ जाणीव नेणीव सांडोनियां मागें । शरण रिघे वेगें एका जनार्दनीं ॥३॥