भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनसमुदाय मिळाला धिक्कारिती नामयाला

janasamuday milala dhikkariti namayala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जनसमुदाय मिळाला धिक्कारिती नामयाला ।। १ ।। विप्र बोलावुनी वेगें। प्रेत नेलें चंद्रभागे ॥२॥ मोठें रचुनी सरण। मध्यें निजविला ब्राह्मण ।। ३।। शय्यागमनीं पहुडला म्हणे अग्नि द्या आम्हांला ||४|| अग्नि दिला जयाप्रती । देव विमानीं पाहती ||५|| विस्मित झाला चक्रपाणी प्रगट होय म्हणे जनी ॥ ६ ॥