भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनक तूं माझा जननी जगाची । करूणा आमुची कां हो नये

janak tun majha janani jagachi | karuna amuchi kan ho naye

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
जनक तूं माझा जननी जगाची । करूणा आमुची कां हो नये ॥१॥ कासया संसार लावियेला पाठीं । पडलीसे तुटी तुमची माझी ॥२॥ जन्म जरा मरण आम्हां सुख दु:ख । पाहासी कौतुक काय देवा ॥३॥ गहिंवरूनी चोखा उभा महाद्वारीं । विनवी जोडूनि करीं विठोबासी ॥४॥