भजनी मालिका
← भजनांकडे परत

जननी हे जाणे बाळकाचें वर्म । सुख दुःख धर्म जें जें कांहीं

janani he jane balakachen varma | sukh duhkh dharma jen jen kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जननी हे जाणे बाळकाचें वर्म । सुख दुःख धर्म जें जें कांहीं ॥१॥ अंधापुढें जेणें दिधला आधार । त्याचा हा विचार तोचि जाणे ॥ध्रु.॥ शरणागता जेणें घातलें पाठीशीं । तो जाणे तेविशीं राखों तया ॥२॥ कासे लागे तया न लगती सायास । पोहोणारा त्यास पार पावी ॥३॥ तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हातीं । दिला त्याची गति तोचि जाणे ॥४॥