भजनी मालिका

भजने

काळेपणाचा आवो अंबरीं बाणला । तो एकु दादुला देखिला डोळां ॥१॥ काळें मनुष्य मानव जालें । अरुप रुपा आलें गोविंदपणें ॥ध्रु०॥

काळोखी खाऊन कैवाड केला धीर । आपुलिया हितें जाले जनामध्यें शूर ॥१॥ कां रें तुह्मी नेणां कां रे तुह्मी नेणां । अल्पसुखासाठी पडशी विपत्तीचे घाणां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काळ्या कांबळ्याची घडी । घालिताती सवंगडी बैसवुनि हरी । कवळ घेती ॥१॥ कृष्ण अपुलेनी हातें । कवळ घाली गडियातें । तयांचीं उच्छिष्ट शितें । घालितसे मुखीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कावडी भरुनि आणिलीं क्षीरें । दहीं घृत सारें नवनीतें ॥१॥ आदनाचेही पर्वत आले । माजि ते केले मिश्रित ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कावळिया नाहीं दया उपकार । काळिमा अंतर विटाळते ॥१॥ तैसें कुजनाचें जिणें अमंगळ । घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कावळ्याच्या गळां मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥ गजालागीं केला कस्तुरीचा लेप । तिचें तो स्वरूप काय जाणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काशासाटीं बैसों करूनियां हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥१॥ काय आलें एका जिवाच्या उद्धारें । पावशी उच्चारें काय हो तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काशासाठीं आम्ही जाळिला संसार । न करा विचार ऐसा देवा ॥१॥ कैसें नेणों तुम्हां करवतें उदास । माझा प्रेमरस भंगावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काशी क्षेत्र श्रेष्ठ सर्वांत पवित्र । परी तेथें वेंचे जीवित्व श्रेष्ठ तेव्हा ॥१॥ तैसी नोहे जाण पंढरी हे । पेठ वैकुंठा वैकुंठ जुनाट हें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

काशी हे पंढरी । प्रयाग नीरा नृसिंहपुरी । पिंड ठेवा पुष्पवती संगमपदावरी । पूर्वज होती चतुर्भुज ॥१॥ सकळ तीर्थें वाराणसी । मध्यनकाळीं येती पंढरीसी । ओंवाळिती विठोबासी । विश्वनाथ ह्मणोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काशीराजक्षेत्रीं जुंपिलें आउत । अष्ट धान्यें तेथें पेरि-येलीं ॥१॥ मेघ:श्यामघोष वर्षे सर्वांधारी । बींज विटेवरी सासि-न्नलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

काष्ठीं अग्नीम असे प्रगटे नयनीं । काष्ठींही असोन्नी वेग-ळाची ॥१॥ तैसें निर्धारितां असे पैं सकळां । दावितां निराळा पांडु रंग ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कास घालोनी बळकट । झालों कळिकाळावरी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥१॥ या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया करावे तपाचे डोंगर । आणीक अपार दुःखरासी॥१॥ कासया फिरावे अनेक ते देश । दावितील आस पुढें लाभ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया गा मज घातलें संसारीं । चित्त पायांवरी नाहीं तुझ्या ॥१॥ कासया गा मज घातलें या जन्मा । नाहीं तुझा प्रेमा नित्य नवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असे ॥१॥ काय पापपुण्य पाहों आणिकांचें । मज काय त्यांचें उणें असें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया जी ऐसा माझे माथां ठेवा । भार तुम्ही देवा संतजन ॥१॥ विचित्र विंदानी नानाकळा खेळे । नाचवी पुतळे नारायण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कासया निर्मिला अपवित्र संसार । न घडे विचार योग्यायोग्य ॥१॥ दिननिशीं मना द्रव्याची वासना । परी नारायणा स्मरण नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ