भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असे

kasaya gunadosh pahon anikanche | maj kay tyanchen unen ase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असे ॥१॥ काय पापपुण्य पाहों आणिकांचें । मज काय त्यांचें उणें असें ॥ध्रु.॥ नष्टदुष्टपण कवणाचें वाणू । तयाहून आनु अधिक माझें ॥२॥ कुचर खोटा मज कोण असे आगळा । तो मी पाहों डोळां आपुलिये ॥३॥ तुका म्हणे मी भांडवलें पुरता । तुजसी पंढरिनाथा लावियेलें ॥४॥