भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासया जी ऐसा माझे माथां ठेवा । भार तुम्ही देवा संतजन

kasaya ji aisa majhe mathan theva | bhar tumhi deva santajan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कासया जी ऐसा माझे माथां ठेवा । भार तुम्ही देवा संतजन ॥१॥ विचित्र विंदानी नानाकळा खेळे । नाचवी पुतळे नारायण ॥ध्रु.॥ काय वानरांची अंगींची ते शक्ती । उदका तरती वरी शिळा ॥२॥ तुका म्हणे करी निमित्य चि आड । चेष्टवूनि जड दावी पुढें ॥३॥