भजनी मालिका
← भजनांकडे परत

काशासाटीं बैसों करूनियां हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा

kashasatin baison karuniyan hat | vauga bobhat dangora ha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काशासाटीं बैसों करूनियां हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥१॥ काय आलें एका जिवाच्या उद्धारें । पावशी उच्चारें काय हो तें ॥ध्रु.॥ नेदी पट परी अन्नें तों न मरी । आपुलिये थोरीसाटीं राजा ॥२॥ तुका म्हणे आतां अव्हेरिलें तरी । मग कोण करी दुकान हा ॥३॥