भजनी मालिका
← भजनांकडे परत

काशी क्षेत्र श्रेष्ठ सर्वांत पवित्र । परी तेथें वेंचे जीवित्व श्रेष्ठ तेव्हा

kashi kshetra shreshtha sarvant pavitra | pari tethen venche jivitva shreshtha tevha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काशी क्षेत्र श्रेष्ठ सर्वांत पवित्र । परी तेथें वेंचे जीवित्व श्रेष्ठ तेव्हा ॥१॥ तैसी नोहे जाण पंढरी हे । पेठ वैकुंठा वैकुंठ जुनाट हें ॥२॥ न लगें वेंचणें धन वित्त जीव । मुख्य एक भाव पुरे येथें ॥३॥ दरुशनें मुक्ति प्राणिया सर्वथा । चुकती नाना चळता पापांचिया ॥४॥ एका जनार्दनीं पंढरीसी जा रे । प्रेमसुख मागा रे विठ्ठल देवा ॥५॥